top of page

संस्थेचा इतिहास

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक इतिहासात श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीचे स्थान अनन्यसाधारण आणि प्रेरणादायी आहे. सन १९७५ मध्ये फुरसुंगी गावातील कार्यकर्त्यांमध्ये अश्या प्रकारचे विचार रुजलेले होते, अश्या ध्येयाची काही मंडळी होती की ज्यांनी ठरवले आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर स्वत: खंबीर बनले पाहिजे, स्वावलंबी बनले पाहिजे. आर्थिक पाठबळ निर्माण केले पाहिजे. याच विचाराने प्रेरित होऊन गावातील कर्तृत्ववान मंडळींच्या धडाडीने, आत्मविश्वासाने, महत्वाकांक्षा व जिद्दीने यापूर्वी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले ग्रामविकास मंडळाचे रुपांतर श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगी मध्ये करण्यात आले व दिनांक ०५ मे १९७६ रोजी त्याची नोंदणी MPT Act 1950 अंतर्गत मा.धर्मादाय सहआयुक्त पुणे विभाग. यांचेकडे करण्यात आली व संस्थेस नोंदणी क्रमांक A – 1406 प्राप्त झाला. संस्थेच्या योजनेमध्ये फुरसुंगी गावचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उत्कर्ष व्हावा यादृष्टीने धोरणात्मक व दिशा देणारी नियमावली तयार केली. फुरसुंगी गावाचे ग्रामदैवत व शिवकालीन परंपरा असणाऱ्या श्री शंभू महादेवाचे स्मरण नित्य होत राहो व समाजउपयोगी कार्य करण्यास प्रेरणा मिळत राहो म्हणून श्री शंभू महादेवाचे नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टला ग्रामदेवतांचे वार्षिक सणवार उत्सव साजरे करता यावेत यासाठी शिवकालीन काळापासून केलेल्या तरतुदीनुसार १४ एकर इनाम शेत जमीन उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मिळाली.

परंतु सामाजिक बदलासाठी गाव साक्षर असणे गरजेचे आहे ही तळमळ तत्कालीन मंडळीना स्वस्थ बसू देत नव्हती त्यातूनच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या व्यवस्थापनाकडे असलेले फुरसुंगी गावातील सन १९६० साली स्थापन झालेले न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय सन १९७६ साली ४१७ विद्यार्थी, १३ शिक्षक व ५ शिक्षकेतर सेवकांसह संस्थेच्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करून घेतले.

 

या संस्थेने ग्रामीण विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्यांचा विकास, सर्वसमावेशक व संस्कारक्षम शिक्षण, समाजासाठी जबाबदार नागरिक घडविणे ही प्रमुख उद्दिष्टे नेहमीच डोळ्यासमोर ठेवून कार्य केलेले आहे. सुरुवातीला मर्यादित साधनामध्ये सुरु झालेल्या संस्थेच्या सर्व शाळा आजमितीला एक भक्कम शैक्षणिक केंद्र म्हणून उभ्या आहेत.

ही संस्था शिक्षणाबरोबरच अनेक धार्मिक कार्यामाध्ये तसेच समाजकार्यामध्ये पुढे आहे. सदर संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. गरजू घटकांना मदत आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन या वैशिष्टपूर्ण पैलूंमुळे सदर संस्था ही आज यशाच्या वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे.

 

श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट हे नाव ज्या ग्रामदैवत श्री शंभू महादेवावरून घेतले आहे त्यामंदिराचे वैशिष्ट म्हणजे हरिहरेश्वराची दोन लिंगी पिंडी की जी अन्यत्र आढळणे दुर्मिळ होय.

संस्थेचे संस्थापक विश्वस्त
संस्थेच्या स्थापनेपासून समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संस्थापक विश्वस्तांची ओळख.

कै.श्री.बाबुराव फकीरराव हरपळे पाटील.png

कै.श्री.बाबुराव फकीरराव हरपळे पाटील

संस्थापक व चेअरमन

05.05.1976 - 05.09.1987

कै.श्री.नामदेवशेठ विश्वनाथशेठ रुकारी.png

कै. श्री. नामदेवशेठ विश्वनाथशेठ रुकारी

संस्थापक व मॅनेजिंग ट्रस्टी

05.05.1976 - 28.11.1983

कै.श्री.फकीरराव शिवराम कामठे.png

कै. श्री. फकीरराव शिवराम कामठे

संस्थापक ट्रस्टी व माजी चेअरमन

05.05.1976 - 18.07.2004

कै.श्री.दत्तात्रय बाबुराव पवार पाटील.png

कै. श्री. दत्तात्रय बाबुराव पवार पाटील

संस्थापक ट्रस्टी व माजी चेअरमन

05.05.1976 - 12.12.2020

कै.श्री.नामदेव महादेव हरपळे.png

कै. श्री. नामदेव महादेव हरपळे

संस्थापक ट्रस्टी

05.05.1976 - 23.03.2000

तसेच संस्थेला वटवृक्ष करण्यामध्ये खालीलप्रमाणे माजी विश्वस्तांचा मोलाचा वाटा आहे.

कै. श्री. सुरेश दत्तात्रय हरपळे

कै. श्री. सुरेश दत्तात्रय हरपळे

ट्रस्टी

05.09.1987 - 12.01.1999

कै_edited.png

कै. श्री. दत्तात्रय बाबुराव हरपळे पाटील

ट्रस्टी

08.03.1999 - 03.10.2005

कै. श्री मारुतीराव पंढरीनाथ हरपळे

कै. श्री. मारुतीराव पंढरीनाथ हरपळे

ट्रस्टी व माजी चेअरमन

22.04.2000 - 13.05.2019

WhatsApp Image 2026-05-01 at yPM.jpeg

श्री. दत्तात्रय फकीरराव कामठे

ट्रस्टी

05.08.2004 - 26.10.2016

IMG_5601.JPG.jpeg

श्री. उत्तम कुशाबा कामठे

ट्रस्टी व माजी मॅनेजिंग ट्रस्टी

11.01.2017 - 06.06.2025

IMG_5596.JPG.jpeg

श्री. सुनिल नामदेवराव रुकारी

ट्रस्टी

24.02.2021 - 06.06.2025

संस्थेचे कार्यरत विश्वस्त मंडळ खालीलप्रमाणे

श्री. शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या कार्याला दिशा देणारे आणि दूरदृष्टीने मार्गदर्शन करणारे  समर्पित विश्वस्त मंडळ.

श्री. सुजीत प्रभाकर रूकारी.HEIC

श्री. सुजीत प्रभाकर रूकारी

चेअरमन

31.07.2025

0B8A6923.JPG.jpeg

श्री. प्रवीण शिवाजी कामठे

मॅनेजिंग ट्रस्टी

16.05.2025

IMG_7810.HEIC

श्री. शिवाजी केरबा कामठे

ट्रस्टी व माजी चेअरमन

02.12.1983

IMG_5593.HEIC

श्रीमती. राखीताई दत्तात्रय हरपळे

ट्रस्टी व माजी मॅनेजिंग ट्रस्टी

03.10.2005

अमित भाऊ.jpg.jpeg

श्री. अमित सुरेश हरपळे

ट्रस्टी

03.08.2019

IMG_9641.HEIC

श्री. विजय जगन्नाथ हरपळे

ट्रस्टी

16.05.2025

IMG_9637.HEIC

श्री. सुधीर चंद्रकांत पवार

ट्रस्टी

06.06.2025

संस्थेची प्रशासन व्यवस्था

संस्थेच्या योजनेतील तरतुदीप्रमाणे चेअरमन, मॅनेजिंग ट्रस्टी, ट्रस्टी यांचे अधिकार व कर्तव्ये यांचे तपशीलवार विवेचनानुसार प्रशासकीय कामकाज चालू असून संस्थच्या प्रशासनाच्या सहकार्यासाठी शासन नियमातील तरतुदीप्रमाणे मुख्याध्यापक समन्वय समिती व शालेय व्यवस्थापन समिती नियुक्त केलेली आहे. वेळोवेळी कायदेशीर व आर्थिक तज्ञांच्या सहकार्याने कामकाज सुलभ सोपे व पारदर्शी पद्धतीने चालविले जाते.

संस्था कार्यक्षेत्र : पुणे जिल्हा, हवेली तालुका

  • Instagram
  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube

© 2026 ALL RIGHTS RESERVE.

bottom of page